नागपुरकर…….पुण्यात ओळख शोधतोय!

महविद्यालयीन शिक्षण पुर्ण होइपर्यंत, मी एकतर महाराष्ट्रीयन, मराठी मुलगा होतो किंवा तरुण रक्त खुपच सळसळले तर एक भारतीय होतो.

पण शिक्षण पुर्ण करुन श्री(आदर दर्शविण्यासाठी) पुणे शहरात आलो. तेव्हा माझ्या/आमच्या बोलण्याच्या लकबीवरुन एक नविनच ओळख पुणेकरांनी आम्हाला दिली, ती म्हणजे ”नागपुरकर”! (कुठे तरी माझ्या वाचनात आले होते, की संशोधनानंतर असे लक्षात आले आहे की प्रत्येक वीस किलोमीटर नंतर भाषेत थोडा बदल होतो)

“नागपुरकर” म्हणजे शब्दशः बघितले तर नागपुर शहराचे रहवासी हा सरळ सरळ अर्थ. परंतु सरळ अर्थ काढला तर पुण्याच्या विद्दवेत  उणेपण नाही का येणार!. म्हणुन यांनी प्रत्येक शब्दाचा आपला स्वतंत्र अर्थ विकसित केला आहे.

जे लोक बोलतांना “बे” या विशेषणाच (?) वापर करतात ते “नागपुरकर” असा यांनी विकसित केलेला अर्थ.

मग हे लोकं आंबे ऐवजी अनेकवचनी आंबाच म्हणतात का असा प्रश्न पडणे स्वभाविकच आहे. कारण आंबे म्हटल तर त्यात पण “बे” आलाच, मग एक तर आंबे म्हणणारा तरी नागपुरकर किंवा आंबे तरी जन्मतहः “नागपुरकर”! आता ह्यातलं काहीजरी मान्य केलं तरी कोकणी जनता सरळ वेगळ्या राज्याची मागणी करून भविष्यात एकही आंब्याची पेटी पुण्यात येऊ देणार नाही! आणि एकवेळ स्वाभिमान गेला तर चालेल पण आंबे नको जायला या ब्रीद वाक्यावर चालणारे पुणेकर. त्यामुळे ह्या दोन्ही परस्थिति ह्यांनी मान्य करणे शक्यच नाही, म्हणुन बे शब्दाचा हा अपवाद. 

याला अजुन एक अपवाद म्हणजे “बे” चे पाढे. अन्यथा “बे” च्या पाढ्यांची रचना नागपुरकरानी केली हे तरी मान्य करणे आले किवां पाढ्यांना तरी “नागपुरकर” म्हणणे आले. आणि हे कुठल्याही परिस्थितित विद्देच्या माहेरघरवासीयांनी मान्य करणे शक्यच नाही. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्र (पुणे) त्यांच्यावर अन्याय करतो असे वाटु नये म्हणुन पुणेकरांनीच पाढे रचले आणि नागपुरकरांची मर्जी राखण्यासाठी त्यांचे “बे” चे पाढे असे नामकरण केले, कदाचित असे स्पष्टिकरण त्यांनी दिले असावे. वेळ, बुद्धिमता, क्षमता, परिस्थिति, आवश्यकता व मतलबानुसार या अपवादामध्ये कमी-जास्त बदल होत राहतात. असो.


तस नागपुर आणि पुणे हे दोन्ही मोठी शहरे आमच्या गावावरुन अंतरानुसार १/३ आणि २/३ च्या प्रमाणात आहेत. (तसे या दोन मोठ्या शहरां व्यतिरिक्त महाराष्ट्रामधील अन्य पण काही लहान-मोठी शहर आमच्या गावाजवळ आहेत. पण पुण्यावरुन निघणारी रेल्वे  नंतर सरळ नागपुरलाच थांबते असा समज (“गैरसमज” म्हणणे चुकीच ठरु शकत!) असणारयांना त्या शहरांची नावे जरी सांगितले  तरी भुत बघितल्यासारखा भाव यांच्या चेहरयावर येेेतो, तेव्हा ह्यांना महाराष्ट्राचा इतिहास-भुगोल शाळेत शिकवला की नाही हा प्रश्न इतरांना पडावा!. पण मला असा कुठलाही प्रश्न पडत नाही कारण एकदा तरी स्वतःला पुणेकर म्हणुन घेण्याची माझी अखेरची इच्छा आहे! (अखेरची इच्छा म्हणजे मॄत्यु आधीची अखेरची नाही, तर अन्य खुपसारया इच्छेच्या यादींमधील अखेरची.)

आम्हाला नागपुरकर हीच ओळख का देण्यात आली?  (तस आम्हाला याची काही अडचण नाही, कारण “अवघे विश्वचि माझे घर” मानणारे “वसुधैव कुटुम्बकम” सिद्धांतावर चालणारे आम्ही). म्हणुन एका वयस्कर अस्सल पुणेरी काकांना सहज प्रश्न विचारला की तुमच्याकरिता कुणालाही “नागपुरकर” ही ओळख देण्याची सीमा सुरु कुठुन होते? 
“माहिति नाही” असे सांगितले तर आपल्या विद्द्वतेवर आक्षेप घेतल्या जाणार, असे वाटल्यामुळे  म्हणा किंवा माझ्या खोचक प्रश्नाला अजुन जास्त खोचक प्रत्त्युत्तर देवुन आपल्या विद्द्वतेचे प्रदर्शन घडवण्यासाठी म्हणा काकांनी दिलेले उत्तर “मनुष्यजातीच्या वसाहतीकरणाचा इतिहास बघता पुणे शहर हे येरवडा पुलापलीकडे वसलेले नसावेच. परंतु विज्ञानयुगात पुलांचा शोध लागला आणि बिल्डर लोकांनी पुणे शहराला येरवडा पुलापलीकडे विस्तारित व नागपुरकरांची सीमा संकुचित करणे सुरु केले. पुणेकर व बिल्डर यांच्यातील पुणे जिल्ह्याची सीमा वाघोली, शिक्रापुर की रांजणगाव किंवा खुपच खुप झाले तर शिरुर हा सौम्य काल्पनिक वाद यश्वसीरित्या तोडीस निघाला की पुढिल सर्व प्रदेशातील लोकांंना दानी पुुुणेेेकर “नागपुरकर” म्हणुन हसत-हसत घोषित करुन टाकतील.” 
तेव्हापासुन मी भाषेमुळे उपस्थित झालेला नागपुरकर सीमाप्रश्न, दहा वर्ष(यापेक्षा कमी कालावधी मध्ये अन्य कुठल्याही देशाच नागरिकत्व कदाचित मिळाले असते) “बे” विशेषणाचा वापर न करता बोलता पुणे शहरामध्ये राहुन, सौम्य वाद सुटण्याची, अजुनही एक नागपुरकर म्हणुनच वाट बघत आहेंं”बे”!!

विनोद आहे, कृपया स्थळ, भाषा व व्याकरण यांकडे थोडे दुर्लक्ष करुन वाचावे.(ही विनंती आहे, अन्य गैरसमज नको)

Published by Chetan Nikam

Father of Cute, Sweet, Lovely Daughter who makes me to forgot all my worries, trouble and tension by single word "BABA". Engineer by profession

2 thoughts on “नागपुरकर…….पुण्यात ओळख शोधतोय!

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started