धर्म म्हणजे …. (जे मला समजले)

मी धर्माविषयीचा तज्ञ वगैरे नाही, पण माझी लहान बुद्धी एक गोष्ट आत्मविश्वासाने सांगू शकते, की भुतलावर आधी मानवाचा जन्म झाला आणि नंतर धर्म ही संकल्पना अस्तित्वात आली. म्हणजे प्रथम मानव आणि नंतर धर्म किंवा आपण असे म्हणू शकतो की धर्म हा मानव निर्मित आहे, मानव हा धर्मनिर्मित नाही.

धर्म संकल्पना अस्तित्त्वात येण्याची  खालील काही कारण असु शकतात
१) मानवाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवुन, त्यांंचे जीवन आरामदायक / सुखकारक बनवण्याकरिता
२) मानवला एकत्र राहण शिकवुन त्यांना सामाजिक प्राणी बनविण्याकरिता
३) मानवाला जगण्याचे नियम, हक्क निश्चित करण्याकरिता
४) सामान्य लोकांना न समजण्यासारख्या गोष्टींविषयी काही तार्किक स्पष्टीकरण देण्यासाठी इत्यादी, कदाचित इतरही काही कारणे असु शकतील. 

परंतु एक गोष्ट निश्चित आहे, कुठलाही धर्म आत्महत्या/स्वहत्या करायला परवानगी देणार नाही किंवा प्रवृत्त पण करणार नाही तसेच इतर कोणाचीही हत्या करायला सांगणार नाही - काही अपवाद वगळता उदा. स्वत: चा बचाव करणे, एखाद्याचा बचाव करण्यासाठी, कोणावर होणारा अन्याय रोखण्यासाठी वगैरे
पण अस काही नसतांना जर धर्म आपल्याला आत्महत्या किंवा कुणाची हत्या करायला सांगत असेल तर
1) सांगण्यात आलेल्या धार्मिक विचारांचा गैरसमज करून घेतला असुन आणि ते विचार पुन्हा योग्यरितीने समजुन घेण्याची आवश्यकता आहे.
किंवा
२) कदाचित एखादी व्यक्ती तुमची दिशाभूल करीत असुन, तुम्हाला त्याचे अनुसरण करणे/ऐकणे थांबविणे आवश्यक आहे, तसेच इतरांनाही थांबायला सांगणे आवश्यक आहे. किंवा
३) जेव्हा ते लिहीले किंवा सांगितले गेले, तेव्हा ते विचार कदाचित योग्य पण असतील, पण वेळेनुसार ते बदलले गेलेले नाहीत, म्हणून मानवतेच्या उत्कर्षासाठी त्याच पुनर्लेखन करण्याची आवश्यकता आहे.
किंवा
४) आपण चुकीच्या मार्गाचे/धर्माचे अनुसरण करीत आहात आणि मानव जातीला वाचवण्यासाठी उशीर होण्यापूर्वी तो बदलण्याची आवश्यकता आहे.
किंवा
५) कुणी हुशार, बुद्धीवान, कुटिल, चाणाक्ष व्यक्ती, स्वहिताकरिता तुमचा वापर करित आहे.

मानव वाचला तरच धर्म वाचेल. जीव देऊन किंवा घेऊन, शेवटी कुठलाही धर्म अस्तित्त्वात राहणार नाही. मानव जीवन हाच धर्म संकल्पनेचा पाया / मुळ आधार आहे. आपण कोणत्या धर्माचे आहात किंवा धर्माचे अनुसरण करता याचा काही फरक पडत नाही.

त्यामुळे खुप उशीर होण्यापूर्वी शहाणे बना आणि आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून धर्माच्या नावावर स्वत:ला आणि इतरांना ठार मारणे थांबवा!

Published by Chetan Nikam

Father of Cute, Sweet, Lovely Daughter who makes me to forgot all my worries, trouble and tension by single word "BABA". Engineer by profession

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started