Triggers – sparking positive change and making it last by Marshall Goldsmith Book Review – Marathi ( ट्रिगर्स -पुस्तक समीक्षा )

मार्शल गोल्डस्मिथ, मुख्यतः व्यवस्थापन कार्यसंघ, उच्च व्यवस्थापनातील लोक, भविष्यातील नेते, विद्यमान नेते यांच्या नेतृत्व विकास कार्यक्रमांचे प्रशिक्षक म्हणून काम करणारे एक उत्तम जीवन प्रशिक्षक आणि तितकेच उत्तम शिक्षक यांनी लिहिलेले हे पुस्तक. त्यांंच्या पक्षकारचे यश, अपयश आणि कार्यक्रम अपूर्ण सोडणारे असे काही उदाहरणे पुस्तकात कारणासह नमूद केलेली आहेत सोबतच संबंधित कथा, तंत्रे, प्रेरणा, प्रयत्न, इच्छित बदल, विकास इत्यादींचा उल्लेखही आहे.

आपली वागणूक, व्यवहार किंवा वर्तन यावर मुख्यतः दोन गोष्टींचा परिणाम होतो: Environment (सभोवताली असलेले लोक, परिस्थिती, वातावरण इ.) आणि Trigger (आपल्याला क्रिया/प्रतिक्रिया करायला प्रवृत्त करणारी भावना).वेगवेगळ्या परिस्थितीत मानवी वर्तनाचे आणि प्रतिक्रियाचे स्पष्टीकरण देण्यासाठी या दोन संज्ञांंची पुस्तकात बरेच वेळा वेगवेगळ्या संदर्भात पुनरावृत्ती झालेली आढळते. Environment ही मुख्य गोष्ट आहे जी विशिष्ट परिस्थितीत मानवी वर्तन / प्रतिक्रिया नियंत्रित करते. एकाच परिस्थितीवर वेगवेगळ्या Environment मध्ये लोकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात आणि Trigger व्यक्तीला चांगली किंवा वाईट क्रिया/प्रतिक्रिया करण्यास प्रेरित करते. Trigger प्रेरणा किंवा परिणाम ची भुमिका करते ज्यामुळे व्यक्ती कार्य करतात किंवा करायला प्रवृत्त होतात.

पुस्तक लिहतांना ज्या मुद्दावर विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे ते म्हणजे व्यक्तीची वर्तणुक, वर्तणुक सुधारणे व व्यक्तीच्या प्रगती, विकासावर जेणेकरून व्यक्तीला स्थिर आणि प्रगतशील व्यावसायिक तसेच वैयक्तिक जीवन व्यतीत करायला मदत मिळेल. पुस्तकात नमूद केलेले उपाय/तंत्रे लोकांना व्यावसायिक जीवन विकसित, गतीमान, प्रगत करायला किंवा वैयक्तिक जीवनात संतुलन साधण्यास मदत करेल किंवा मार्गदर्शक बनेल. पुस्तकामध्ये काही योग्य, मनोरंजक, चित्तवेधक आणि संबंधित उदाहरणांचा उल्लेखही आहे.

पुस्तकाचा मुख्य विषय भविष्यातील किंवा विद्यमान पुढारी/मार्गदर्शक/अग्रणी (विशेषतः कंपनी किंवा संस्थामधील) यांच्या विकासावर किंवा त्यांच्या उणीवा दुर करुन त्यांना विशिष्ठ पदाकरिता अनुरुप बनवणे आहे (परंतु कोणीही पुस्तकात सांगितलेली तंत्रे स्वतःच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी वापरु शकतो). पुढाऱ्यांनी शांत आणि संयमी कसे राहावे, स्वतःवर नियंत्रण ठेवून वातावरणाप्रमाणे कसे वागावे, स्वयं-विकासाचे विविध तंत्र व अशाच प्रकारच्या तंत्राचा विषय पुस्तकात हाताळला आहे.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकामध्ये सांगितलेले उपाय/पद्धती/तंत्र, खुप जास्त प्रयत्न न करता सहजासहजी अंमलात आणणे शक्य आहे. दिलेली उदाहरणे सहज समजणारी, पुरक आणि सोपी आहेत. पुस्तकात स्वतःला/इतरांना विचारायच्या प्रश्नांच्या प्रकारांचा; अधिक योजनाबद्ध पद्धतीने कसे काम करावे आणि त्याचे फायदे; स्वत: मधून उत्तम कसे मिळवावे; संभाषण व इतरही अशाच काही मुददांंचा समावेश केला आहे. जे व्यक्तीला लाभकारी ठरु शकतात.

पुस्तकामध्ये सांगितलेले सर्व उपाय किंवा तंंत्राची अंमलबजावणी करणे कदाचित अवघड आहे. परंतु कमीतकमी एक तंत्र तरी आत्मसात करुन त्याची अंबलबजावणी करत वर्तनात बदल करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि यामुळे नक्कीच लाभ होईल (स्वानुभवावरुन).

वैयक्तिक किंवा व्यावसायिक प्रगतीसाठी, स्वत:च्या विकासासाठी, व्यावसायिक वृद्धीसाठी, नातेसंबंध सुधारण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे ( वेगवेगळ्या कंपनी द्वारे देण्यात येणारे ४-५ व्यावसायिक प्रशिक्षण या एकाच पुस्तकामध्ये समाविष्ट आहे).आवश्यक, योग्य, पुरक ते तुम्ही यातून घेऊ शकता.जर हे सकारात्मकरित्या वाचले तर निश्चितपणे यातून प्रगती करायला मदत मिळणार.

वाचण्यापुर्वी लक्षात ठेवण्यासारखी महत्वाची गोष्ट, हे पुस्तक स्वतःच्या वैचारिक प्रगतीसाठी,विकासासाठी, वागणूकी मध्ये बदल घडवुन आणण्यासाठी, नातेसंबंध योग्यरित्या हाताळता यावेत व अशाच इतर गोष्टीं करिता मदत करेल. जर व्यक्तीला वाटत असेल की त्याच्या बाँस, निरिक्षक,सहकारी, सहकर्मचारी,अधीनस्थ, भागीदार, पत्नी, नातेवाईक किंवा इतर कोणाला बदलण्याची आवश्यकता आहे आणि स्वतःला नाही, तर या पुस्तकाला हातात घेऊन स्वतःचा वेळ व्यर्थ वाया घालणे टाळलेले उत्तम.

Triggers – sparking positive change and making it last by Marshall Goldsmith Book Review – English

A book, written by one of the good life coaches and educator Marshall Goldsmith. He works as a guide/coach for leadership development programs with the management team, higher management people, future leaders, development of current leaders, etc. Some examples of his client’s success, failure, and program incompletion are mentioned in the book with reasons. Their relevant stories, techniques,  motivation, efforts, desired changes, development, goal, goal setting, etc. are also mentioned.

Behaviour is affected by two things: Environment and Trigger. These two terms are used repetitively in the book to explain human behavior in various situations. Environment plays an important role to control human behavior/reaction in specific situations. In different environments, the person will have different reactions to the same situation. The trigger is the thing that inspires a person to do, act or react to a specific situation, it may be good or bad. The trigger is like motivation, inspiration, or consequence which makes a person act, react or do something.

A book is written with a major focus on human behavior and the up-gradation of human behavior for stability and growing professionally as well as personal life. The techniques mentioned in the book will help the person to grow professionally, better behavior in relations, and make balance in personal life. Some relevant examples of it are also mentioned in the book.

Book’s major focus is on the development of future leaders or current leaders (but anybody can use techniques mentioned in the book for professional as well as personal growth). Many techniques are mentioned in the book for the leaders to keep calm, patient, and behave as per the environment by keeping the triggers in control along with various techniques of self developments.

Most importantly, the techniques are simple and easy to implement without much effort. The examples of the leaders given are inspiring, exciting, and easy to understand. The book includes the points like types of questions to be asked to self and others; structured /planned life and its benefits; ways to get the best out of self, goal setting, listening, communication, etc.

Maybe implementing all the techniques in our life are difficult but a person can try at least one (behavioral change or technique) to implement and it will definitely help (self-experience).

Must read this book (includes 4-5 professional pieces of training combined in it) to improve personal or professional relationships, to grow professionally, for self-development. If you open the page with a positive mindset, it will definitely help for self-development, grow professionally, improve communication, listening, etc.

One thing to keep in mind, this book is for the person’s own development, behavioral change, growth, relation-building, etc. Don’t read it if you think your boss, colleague, partner, relative, subordinate, or anybody else needs the change and you don’t.

Daughter…Bundle of Happiness. .1

After a hectic and CORONA feared day I came back from the office. Without talking or taking her in arms, I directly went to the bathroom as a safety/precaution , nowadays due to CORONA it is recommended you must have a bath after returning from outside.

It is summer days and after 1 hour travelling, I was feeling thirsty but as a precaution preferred not to touch a glass of water, before bath. After the bath I felt refreshed and better, next I was expecting a glass of cold water to drink for feeling better.

She has been waiting for me since morning and looking for me from the moment I returned home.She was expecting, I will talk with her, play with her and pick her up in my arms. But I prefered, first to dry myself with a towel and wear cloth, she came to a bedroom where I was getting ready.

She is only 20 months old, hardly listens and behaves as per our instructions or what we say. Still, to keep her engaged so that I must get ready soon and play with her, I just asked her “Aarna ja mala pinyakarita pani aan (Aarna bring a glass of drinking water for me)”.

I thought she mostly would not react to what I just said and I didn’t expect any reaction from her. But as soon as I asked her for a glass of  water, her first quick reaction was she immediately left the room (I felt she got angry because I asked her to do some work instead of playing with her and that also when she was waiting for me since morning).I continued with my stuff, so that I could lift her in arms,play with her and talk to her.

After 2-3min, she returned to the bedroom with the water bottle.A smile came on my face and I felt happy after looking at the water bottle in her hand.I had known a water bottle contained yesterday night’s water in it, the bottle was kept outside to water a tree and it is hot and difficult to drink in this summer days of 44℃.But I was on top of the world that moment because my 20 months old daughter has shown love and affection for me (I was not expecting from her) and she brought water to drink for me, when I was expecting and needed water to drink. I didn’t want to ignore her affection towards me, so I didn’t think for a second and drank that hot water and looking at this she clapped and smiled affectionately. Suddenly a drop of tear came from my eye.

I realised my daughter is growing and now old enough to listen to us and show her love from her activities. Maybe that’s why people say “betiya bahut jaldi badi ho jati hai aur maa-baap ko pata bhi nahi chalata….” (Girl grow fast and parents don’t know )

कन्यारत्न……..आनंदाची चावी…….१

थकुन भागुन कंटाळवाणा व कोरोनाच्या भिती ने काळवटलेला दिवस संपवुन मी ऑफिसमधून घरी परत आलो. घरी येताच तिला न बोलता, तिच्याकडे न बघता किंवा तिला कडेवर न घेता,कोरोनापासुन खबरदारी आणि सुरक्षितता म्हणून आंघोळीसाठी सरळ बाथरूममध्ये गेलो. सध्या कोरोनामुळे बाहेरून आल्यानंतर आंघोळ करायला हवी असा सल्ला / सुचना देण्यात आल्या आहेत.

उन्हाळ्याचे दिवस आणि एक तासाच्या प्रवासामुळे मला तहान पण लागली होती.पण आंघोळीपुर्वी खबरदारी म्हणून पाण्याच्या पेल्यालासुद्धा हात न लावणे मी पसंत केले. आंघोळ केल्यावर माझा शीण कमी झाला व मला ताजेतवाने वाटले, त्या नंतर मी मस्त थंड पाणी पिण्याचा विचार करत होतो.

ती सकाळपासूनच माझी वाट पाहत तातकळत होती म्हणून मी घरी परत आल्यापासून माझ्या कडे आशेने बघत होती.चिमुकलीची खुप चिमुकली अपेक्षा होती, मी तिच्याशी बोलावे,उचलुन कडेवर घ्यावे, तिच्याशी खेळावे. पण अंग ओले असल्यामुळे,आधी स्वतः ला टॉवेलने कोरडे करणे आणि कपडे घालणे आवश्यक समजले.ज्या खोली मध्ये मी तयारी करत होतो, त्या खोली मध्ये येऊन ती माझ्या कडे बघत उभी होती.

फक्त २० महिन्यांची ती चिमुकली, आमच एक म्हणून ऐकत नाही आणि कदाचित ऐकले तर त्याच अनुसरण केलेले मला आठवत नाही, पण तीनी काही वेळा त्या विपरित वागुन, आम्ही काय उपदेश दिला होता हे पुनःविचार करायला आम्हाला भाग पाडल आहे.

हे सर्व ज्ञात असुनही (मला लवकर तयार होऊन तिच्या सोबत खेळता यावे) माझ्या मध्येमध्ये तिने चुळबूळ नको करायला म्हणून तिला व्यस्त ठेवण्याकरिता मी तिला सहजच म्हटले “आर्णा जा माझ्यासाठी एक ग्लास पिण्याचे पाणी घेऊन ये”. मला वाटले की ती बहुधा माझ्या बोलण्याला गांभीर्याने घेणार नाही आणि त्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही आणि मला तशी अपेक्षा पण नव्हती, कदाचित अपेक्षा करणे मुंगेरीलाल के हसीन सपने बघण्यासारखा झाल असत.

तिला एक ग्लास पाणी आणायला सांगताच,ती घाइ-घाइत पाय आपटत खोलीतून बाहेर निघुन गेली. तिची अशी प्रतिक्रिया बघुन एका क्षणासाठी मला वाटले तिला माझा राग आला आहे. कारण तिच्यासोबत खेळण्याऐवजी तिला काम करण्यास सांगितले आणि विशेष म्हणजे जेव्हा की ती सकाळपासून माझी खेळायला वाट पाहत होती. मी माझ्या कामात पुन्हा गुंतून गेलो जेणेकरुन लवकरात लवकर तयार होऊन, मी तिला कडेवर वर घेऊन तिच्याशी बोलू शकेन,खेळू शकेन.

२-३ मिनिटानंतर ती पुन्हा खोलीमध्ये परतली आणि तिच्या हातात पाण्याची बाटली पाहिल्यावर मला आश्चर्यच वाटल आणि माझ्या चेहऱ्यावर स्मित हसु आल.

बाटली मधील पाणी आधल्या रात्रीचे होते आणि ते पाणी झाडाला टाकण्यासाठी बाटली बाहेर ठेवली होती. उन्हाळ्याचे दिवसामुळे बाटली मधील पाणी गरम झाले होते. ४४ ℃ तापमानामध्ये ते पाणी पिने त्रासदायक होते.पण त्याक्षणी माझ्या २० महिन्यांच्या मुलीने माझ्याबद्दल दाखवलेल्या ममता,आपुलकी आणि प्रेमाने मी भारावून गेलो होतो, विशेष म्हणजे तिच्याकडून हे सर्व अपेक्षित नसतांना. मी तहानलेला असतांना माझ्या करिता पिण्याचे पाणी आणून, तिने माझ्याबद्दल दाखवलेल्या ममता,आपुलकी आणि प्रेमाकडे दुर्लक्ष करणे तिच्या बाल मनाला नाराज करण्यासारखे होते. म्हणून मी एक सेकंदाचाही विचार न करता ते गरम पाणी पिले. मला पाणी पितांना बघुन, ती बोबड़ी आनंदी झाली आणि टाळ्या वाजवत प्रेमाने गोड हसली. हे सर्व बघुन अचानक माझे डोळे पाणावले.

तेव्हा मला समजले की आमची मुलगी हळु हळु (आमच्या न-कळत) मोठी होत आहे. आता ती आमचे म्हणणे ऐकून घेते आणि त्याप्रमाणे वागते सुद्धा, सोबतच वेगवेगळ्या कृतीतून आपले प्रेम ही दाखवते.

कदाचित म्हणूनच म्हणतात “बेटियां बहूत जल्दी बड़ी हो जाती है और माँ-बाप को पता भी नहीं चलता ….” .

बेटी…….हंसी और खुशीयो की पहचान….१

मैं थका-भागा, व्यस्त और कोरोनासे भयभीत दिन पुरा करके कार्यालय से घर वापस आया। घर पहुचते ही एहतियात और सावधानी के तौरपे, उससे बात किए बिना या गले लगाये बिना नहाने के लिए सीधे बाथरूम में गया। (इस समय, कोरोना की वजह से बाहरसे घर लौटते ही, सबसे पहले नहाने की सलाह दी गयी है।)

गर्मी के दिन और एक घंटे की यात्रा की वजह से मुझे प्यास लगी थी। लेकिन एहतियात के तौर पर नहाने से पहले पानी के प्याले को भी नहीं छूने का मैने फैसला किया।नहाने के बाद मै तरोताजा और बेहतर महसूस कर रहा था। और अच्छा लगे इसलिये ठंडा पानी पीने का सोच रहा था।

वह सुबह से ही मेरा घर पर इंतजार कर रही थी और जिस पलसे मैं घर लौटा था उसी पल से मुझे देख रही थी। वह नन्ही परी इंतजार कर रही थी की मैं उससे बात करूं, उसे गोदी में उठाऊं और उसके साथ खेलु।

लेकिन गिले अंग से उसे गोद मे लेना ठीक नही यह सोचकर मुझे एहसास हुआ कि मुझे अपने आप को तौलिये से सूखाने और कपड़े पहनने की ज़रूरत है। जहां मैं तैयार हो रहा था वो उस कमरे में आकर, मेरे तरफ देखते हुये कोने मे खडी थी।

वह केवल २० माह की है और मुझे याद नही की उसने हमारी कोइ बात कभी सुनी या समझी हो और उसके अनुसार व्यवहार कीया हो।लेकिन कभी-कभी हमारे कहने के विपरीत काम करके, हमने उसे क्या उपदेश दिया था, हमे ही इसका पुनर्विचार करने पर मजबुर किया है। यह सब पता होने के बावजूदभी,सिर्फ उसे व्यस्त रखने के लिए (ताकि मैं जल्द से जल्द तैयार होकर उसके साथ खेल सकूं, उसे गोद में उठा सकूं) मैंने उसे कहा “आर्णा जा मला पिण्याकरिता एक ग्लास पाणी आन (आर्णा,मेरे पीने के लिए एक ग्लास पानी लाओ)”।

मुझे लगा कि वो मेरी बातों को गंभीरता से नहीं लेगी और इस पर कोई प्रतिक्रिया नहीं करेगी और ऐसा कुछ करे ऐसी उम्मीदभी मुझे नहीं थी। शायद उससे उम्मीद करनाभी “मुंगेरीलाल के हसीन सपने” देखने जैसा होता।

जैसे ही मैंने उसे पिने के लिए पानी लाने को कहा, वह तुरंत कमरे से बाहर चली गई। उसकी यह प्रतिक्रिया देखकर, मुझे एक पल के लिए लगा कि वह मुझसे नाराज है और घुस्सा हो गयी है। क्योंकि उसके साथ खेलने के बजाय मैंने उसे काम करने के लिए कहा और खास कर तब, जब वह सुबह से मेरे साथ खेलने का इंतजार कर रही थी। मैं फिरसे खुदकी तैयारी मे जुट गया ताकि मैं जल्द से जल्द तैयार होकर, उसे गोद मे ले सकूं और उससे बात कर सकूं, उसके साथ खेल सकूं।

२-३ मिनट के बाद वह कमरे में वापस आई और जब मैंने उसके हाथ में पानी की बोतल देखी, तो मैं हैरान रह गया और खुशी से मेरे चेहरे पर मुस्कान आ गयी।

जो पानी की बोतल वो लेकर आयी थी, उसमें कल रात का पानी था और वो पानी पेड़ को डालने के लिये बोतल बाहर रखी थी, इस वजहसे वो पानी गर्म हो गया था। ४४℃ तापमान वाले गर्मी के दिनों में वो पानी पिना तकलीफ देनेवाला एवं मुश्किल था। लेकिन उस समय, मैं अपनी २० माह की बेटी द्वारा मेरे प्रति दिखाए गए प्यार,ममता और स्नेह से अभिभूत था (खासकर जब उससे इसकी उम्मीदभी नहीं थी)। मुझे प्यास लगने पर मेरे लिए पीने का पानी लाकर मेरे प्रति उसने जो स्नेह, ममता और प्यार दिखाया था उसको नजरअंदाज कर उसके बाल मन को नाराज नही चाहता था, इसलिए मैंने एक पल के लिए भी बिना कुछ सोचे-समझे उस गर्म पानी को पी लिया। यह देखकर वह खुश होकर टाली बजाने लगी और प्यार से मुस्कुरायी। ये सब देख अचानक मेरी आँखे नम हो गयी।

तब मुझे एहसास हुआ कि हमारी बेटी धीरे-धीरे बड़ी हो रही है और अब वह इतनी बडी हो गयी है की हमारी बाते सुनती, समझती है और उसके अनुसार  काम भी करती है, साथ ही अपनी चुुुलबुुली हरकतोसे हमाारे प्रति अपना प्यार भी जताती है।

शायद इसीलिए लोग कहते हैं “बेटियाँ बहुत जल्दी बड़ी हो जाती हैं और माँ-बाप को पता भी नही चलता …”।

धर्म म्हणजे …. (जे मला समजले)

मी धर्माविषयीचा तज्ञ वगैरे नाही, पण माझी लहान बुद्धी एक गोष्ट आत्मविश्वासाने सांगू शकते, की भुतलावर आधी मानवाचा जन्म झाला आणि नंतर धर्म ही संकल्पना अस्तित्वात आली. म्हणजे प्रथम मानव आणि नंतर धर्म किंवा आपण असे म्हणू शकतो की धर्म हा मानव निर्मित आहे, मानव हा धर्मनिर्मित नाही.

धर्म संकल्पना अस्तित्त्वात येण्याची  खालील काही कारण असु शकतात
१) मानवाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवुन, त्यांंचे जीवन आरामदायक / सुखकारक बनवण्याकरिता
२) मानवला एकत्र राहण शिकवुन त्यांना सामाजिक प्राणी बनविण्याकरिता
३) मानवाला जगण्याचे नियम, हक्क निश्चित करण्याकरिता
४) सामान्य लोकांना न समजण्यासारख्या गोष्टींविषयी काही तार्किक स्पष्टीकरण देण्यासाठी इत्यादी, कदाचित इतरही काही कारणे असु शकतील. 

परंतु एक गोष्ट निश्चित आहे, कुठलाही धर्म आत्महत्या/स्वहत्या करायला परवानगी देणार नाही किंवा प्रवृत्त पण करणार नाही तसेच इतर कोणाचीही हत्या करायला सांगणार नाही - काही अपवाद वगळता उदा. स्वत: चा बचाव करणे, एखाद्याचा बचाव करण्यासाठी, कोणावर होणारा अन्याय रोखण्यासाठी वगैरे
पण अस काही नसतांना जर धर्म आपल्याला आत्महत्या किंवा कुणाची हत्या करायला सांगत असेल तर
1) सांगण्यात आलेल्या धार्मिक विचारांचा गैरसमज करून घेतला असुन आणि ते विचार पुन्हा योग्यरितीने समजुन घेण्याची आवश्यकता आहे.
किंवा
२) कदाचित एखादी व्यक्ती तुमची दिशाभूल करीत असुन, तुम्हाला त्याचे अनुसरण करणे/ऐकणे थांबविणे आवश्यक आहे, तसेच इतरांनाही थांबायला सांगणे आवश्यक आहे. किंवा
३) जेव्हा ते लिहीले किंवा सांगितले गेले, तेव्हा ते विचार कदाचित योग्य पण असतील, पण वेळेनुसार ते बदलले गेलेले नाहीत, म्हणून मानवतेच्या उत्कर्षासाठी त्याच पुनर्लेखन करण्याची आवश्यकता आहे.
किंवा
४) आपण चुकीच्या मार्गाचे/धर्माचे अनुसरण करीत आहात आणि मानव जातीला वाचवण्यासाठी उशीर होण्यापूर्वी तो बदलण्याची आवश्यकता आहे.
किंवा
५) कुणी हुशार, बुद्धीवान, कुटिल, चाणाक्ष व्यक्ती, स्वहिताकरिता तुमचा वापर करित आहे.

मानव वाचला तरच धर्म वाचेल. जीव देऊन किंवा घेऊन, शेवटी कुठलाही धर्म अस्तित्त्वात राहणार नाही. मानव जीवन हाच धर्म संकल्पनेचा पाया / मुळ आधार आहे. आपण कोणत्या धर्माचे आहात किंवा धर्माचे अनुसरण करता याचा काही फरक पडत नाही.

त्यामुळे खुप उशीर होण्यापूर्वी शहाणे बना आणि आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून धर्माच्या नावावर स्वत:ला आणि इतरांना ठार मारणे थांबवा!

Religion Means…. (what I understand)

I am not an intellectual or expert about religion. But my small mind can tell one thing confidently, that concept of Religion came to existence far far after life came to earth. Means life is first and then religion or you can say religions are for humans and not other way round.
We can say religion came to existence for

1) To make human’s life comfortable by giving them path to follow for living

2) Make human social animal

3) During socialization fix some rules, regulation, rights for living

4) Give some logical explanation to the things that are not understandable to general people etc. and may be some other reasons.


But one thing, none of the religions will ask you to waste your own life or kill other’s – excluding some exceptional cases like self defense , for saving somebody, to stop injustice etc. If so,
1) You must have misunderstood the thoughts and you need to revisit and learn it again.

or

2) Somebody must be misleading you and you need to stop following or listening him, also tell others to stop.

or

3) Thoughts might be correct, at times when it was written or told and it was not changed as per time, so you need to rewrite them for the betterment of humanity.

or

4) You are following wrong path and needs to change it before it’s too late and help humanity to grow

or

5) Someone with very good brain is using you for his benefits, so use your brain wisely before it’s too late
Because religion will exist only if humans are saved.

By taking lives, at the end not a single religion will exist.Lives are the base for any religion.So be clever human before it’s too late and stop killing self and others in the name of religion, doesn’t matter what religion you are following.

Gulabo- Sitabo Hindi Movie Review in English

Gulabo Sitabo, approximately 2hrs movie streaming on Amazon Prime. Story doesn’t have any specific relation with the title except 2-3 scenes of a puppet show with the name Gulabo-Sitabo shown in the background. You can watch this movie with title Fatima Mahal,Mirza-Begum, Mirza ke mahal me Bankey behaal, Begum aur Gulam, Mirza Ke Begum Par Abdul Fida, Adiyal Kirayedar, Purana Mahal, Mirza-Begum ki Premkahani, Tu-Tu-Mai-Mai or chose any you would like. It will be suitable like Gulabo Sitabo.

Best part is star cast Mirza (Big B), Bankey (Aayushman) and Gyanesh Shukla (Vijay raaj) to talk about their acting is like Light up the sun.Supporting cast Christopher Clark (Brijendra Kala), Guddo (Srishti Shrivastava) and others did justice to their role. Fatima Begum (Farrukh Jafar) is a Bumper Lottery with a bonus in her 4-5 scene.

It’s a simple story about 100-120 year old Fatima Mahal, 95 year old Fatima Begum, owner of the Haveli. Mirza is her husband, greedy or crazy about haveli and always fighting with tenants over the rent, maintenance, behaviour etc. All the tenants have fixed their roots in haveli, not leaving haveli and paying negligible rent. Bankey is one of the tenants paying very less rent amongst all. Gyanesh Shukla, an officer of the Archeological department plans to encroach Haveli by declaring it a historical monument and a government property.For that he tempts the tenant with some fake commitment of a new flat and convince them to vacate haveli.He tries to kick out Mirza-Begum by warning them about Haveli by saying Haveli can collapse anytime and is dangerous to live. Christopher Clark tries to help Mirza to change ownership of the Haveli.

In short, the story is all about a Tom-n-Jerry fight of Mirza-Baankey-Gyanesh for Fatima Mahal.

Director Shoojit Sircar with classy and elite starcast (BigB, AyuKhu) put all his effort to reach the height of expectation but rope of a story doesn’t allow them to reach the peak.

You can watch it without much hope, to know the end of the Tom-n-Jerry fight between Mirza-Bankey, to know who finally owns the Haveli and for a social message.You will get a sweet candy of some funny scenes as a refreshment.

Else you can skip it without losing anything and saving time.

Gulabo- Sitabo – Movie Review in Marathi (मराठी)

गुलाबो सीताबो, अमेज़न प्राइम वर प्रदर्शित झालेला २ तास लांबीचा चित्रपट. २-३ दृश्यांच्या पार्श्वभूमीत दिसलेल्या गुलाबो-सीताबो या बाहुल्यांच्या खेळाशिवाय चित्रपटाच्या शीर्षकाचा कथेशी काही संबंध नाही. फातिमा महल, मिर्झा-बेगम, मिर्झा के महल मे बांके बेहाल, बेगम और गुलाम, मिर्झा के बेगम पर अब्दुल फिदा, अड़ियल किरायेदार, पुराणी हवेली, मिर्झा-बेगम की प्रेमकहानी, तू-तू-मै-मै अथवा अशाच धाटणीच्या तुमच्या आवडीच्या अन्य कुठल्याही शीर्षकासह तुम्ही हा चित्रपट बघु शकता. ते शीर्षक गुलाबो सीताबो इतकेच कथेला अनुरुप असेल.

मिर्झा (अमिताभ बच्चन), बांके (आयुष्मान) आणि ग्यानेश शुक्ला (विजय राज) अशा सर्वोत्कृष्ट कलाकारांची मांदियाळी असलेला चित्रपट. या कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलणे म्हणजे सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखे आहे. परंतु यांचा सोबतच क्रिस्तोफर क्लार्क (ब्रिजेंद्र कला), गुड्डो (सृष्टि श्रीवास्तव) आणि इतरांनी उत्कृष्ट अभिनय करून आपल्या भूमिकेस न्याय दिला आहे. फातिमा बेगम (फारुख जाफर) तिच्या मोजक्या ४-५ दृष्यांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडुन जाते, त्यांची भूमिका दर्शकांसाठी बोनस बंपर लॉटरीसारखी आहे.

चित्रपटाची कथा १००-१२० वर्ष जुन्या फातिमा महल या हवेलीवर आधारित आहे. हवेलीच्या मालकिन ९५ वर्षांच्या फातिमा बेगमचा नवरा मिर्झा; चिड़का, स्वार्थी, लोभी आणि हवेली स्वत:च्या नावावर करून घेण्यासाठी वेडा असतो. जुन्या म्हातारया घर मालका प्रमाणे तो नेहमी भाड़ेकरून सोबत भाडे, हवेलीचा देखभाल व दुरुस्ती खर्च, त्यांची रहन-सहन, वागणूक अशा विविध विषयावरून वाद घालताना दाखवला आहे. सर्व भाड़ेकरू हवेलीवर ताबा करून ठान मांडुन बसलेले असतात आणि दीडदमड़ी इतके घरभाडे देतात. बांके त्यामध्ये पण सर्वांत कमी घरभाडे देत असतो आणि खुप वर्षांपासून त्यानी घरभाड़े वाढवले पण नसते. ग्यानेश शुक्ला पुरातत्व विभागाचा एक अधिकारी जुन्या हवेलीला ऐतिहासिक वास्तु दाखवून, त्याला सरकारी मालमत्त्ता घोषित करत हवेलीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्नात असतो. त्यासाठी तो भाड़ेकरुंना नवीन घर देण्याचा मोह दाखवून त्यांना घर खाली करायला राजी करतो, हवेलीमध्ये वास्तव्य करने जीवाला घातक व धोकादायक आहे असे दाखवून मिर्झा व बेगम यांना बाहेर काढायचा विचारतो असतो. ख्रिस्तोफर क्लार्क हवेली मिर्झाच्या नावावर करून घेण्यास मदत करत असतो.

थोडक्यात कथा, फातिमा महल या जुन्या हवेलीच्या भोवती गुंफलेली मिर्झा-बांके-ग्यानेश यांची हवेलीसाठीची पळापळ दाखवणारीआहे.

अभिजात उच्च दर्जाचे अभिनेते अणि त्याच दर्जाचा दिग्दर्शक शुजित सरकार यांनी मनोरंजनाचे शिखर गाठण्याचा निस्वार्थ प्रयत्न केला आहे पण कथेचा पहाड़ त्यांना पार करता आला नाही.
मिर्झा-बांके मधील उंदीरमांजरीची तू-तू मी-मी कशी संपवली आहे, शेवटी हवेलीची मालकी कोणाला मिळते आणि सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी,विशेष मनोरंजन अणि विनोदाची अपेक्षा न करता हा सिनेमा बघु शकता. अध्ये-मध्ये एखादा विनोदी व मजेशीर प्रसंग आपल्याला हसवून थोड़ी उमेद देणारा ठरेल.

न बघण्याच ठरवले तरी आपण खुप मोठ मनोंरजन वगेरे काहीच गमावणार नाही अणि स्वत:चा वेळ वाचवणार ते वेगळ.

Gulabo- Sitabo – Movie Review in Hindi (हिंदी)

गुलाबो सीताबो, अमेजन प्राइम पर रिलीज़ हुई २ घंटे लंबी फिल्म। २-३ दृश्यों में पृष्ठभूमि में दिखाया गया गुलाबो -सीताबो कठपुतलीयो के खेल सिवाय फिल्म के शीर्षक का कहानी से संबंध नहीं। फातिमा महल, मिर्ज़ा-बेगम, मिर्ज़ा के महल में बांके बेहाल, बेगम और ग़ुलाम, मिर्ज़ा की बेगम पर अब्दुल फ़िदा, अड़ियल किरायेदार, पुरानी हवेली, मिर्जा-बेगम की प्रेम कहानी, तू-तू-मैं-मैं या इस लहजे के आपके पसंद के अन्य किसीभी शीर्षक के साथ आप यह फिल्म देख सकते हैं। और वह शीर्षक गुलाबो सीताबो के तरह ही कहानी को जंचेगा।

मिर्झा (अमिताभ बच्चन), बांके (आयुष्मान) और ग्यानेश शुक्ला (विजय राज) जैसे सर्वश्रेष्ठ अभिनेताओं द्वारा अभिनीत यह फिल्म. इनके अभिनय के बारे में बात करना सूरज को आइना दिखाने जैसा है। क्रिस्टोफर क्लार्क (बृजेन्द्र काला), गुड्डो (सृष्टि श्रीवास्तव) और अन्य सहकलाकारों ने भी अपने अभिनय से भूमिकाओं के साथ न्याय किया है। फातिमा बेगम (फारुख जाफर) ४-५ दृश्यों में ही अपने अभिनय से प्रभावित कर गयी हैं, उनकी भूमिका दर्शकों के लिए दूध में शक्कर डालने जैसा है।

फिल्म की कहानी १००-१२० साल पुरानी “फातिमा महल” नामक हवेली पर आधारित है। हवेली की मालकिन ९५ वर्षीय फातिमा बेगम के पति मिर्झा,स्वभाव से चिढ़नेवाले, स्वार्थी, लालची और हवेली पर कब्जा कर खुद के नाम पर उतारने के पीछे पागल है। मिर्झा हमेशा किरायेदारों के साथ किराया, साफसफाई और मरम्मत का खर्च, रहन-सहन, व्यवहार जैसे विभिन्न मुद्दों को लेकर लड़ता रहता हैं। सभी किरायेदारों ने हवेली पर कब्जा कर रखा हैं और उसके बदले में बहुत ही कम किराया देते हैं। उन सब में भी बांके सबसे कम किराया देता हैं और कई सालोसे उसने किराया बढ़ाया भी नहीं। पुरातत्व विभाग का अधिकारी ग्यानेश शुक्ला हवेली को हथियाने की कोशिश कर रहा हैं। इसलिए वो हवेली को ऐतिहासिक धरोहर घोषित कर उस पर सरकारी संपत्ति के रूप में अतिक्रमण करने के लिये, किरायेदारों को दूसरा घर देने का लालच देकर हवेली खाली करने के लिये उकसाता हैं । साथ ही हवेली बहुत पुरानी हैं, कभी भी गिर सकती हैं और हवेली में रहना जीवन के लिए खतरनाक है कहकर मिर्झा और बेगम को हवेली से निकालने के पीछे पड़ा हैं । क्रिस्टोफर क्लार्क हवेली मिर्झा के नाम उतारने में मदद करता हैं। 

संक्षिप्त में कहानी एक पुरानी हवेली “फातिमा महल” के इर्द-गिर्द घूमती है। हवेली के लिये मिर्झा-बांके-ग्यानेश कैसे चुहें-बिल्ली के तरह लड़ते है ये दिखाया गया है।

उत्कृष्ट और अभिजात अभिनेताओंने (अमिताभ, आयुष्मान, विजयराज) और उसी क्षमता के निर्देशक शूजीत सरकार ने फिल्म को मनोरंजन के शिखर पर पहुंचाने का निस्वार्थ प्रयास किया है लेकिन वह कहानी के रोड़े को पार नहीं कर पाए।

मिर्झा-बांके के बीच चल रहा चूहे-बिल्ली का खेल कैसे खत्म होता हैं, अंत में हवेली पर किसका राज चलता हैं, हवेली अंत में किसे प्राप्त होती हैं और फिल्म द्वारा दिया गया सामाजिक संदेश जानने के लिये,बिना किसी विशेष मनोरंजन और हंँसी की आस रखे, आप इस फिल्म को देख सकते हैं। बीच बीच में मनोरंजक या मजेदार  दृश्य आपको हंसाकर थोड़ी ताज़गी और उम्मीद देगी।

आप न देखने का फैसला भी अगर करते हैं,तो मनोरंजन के नजरसे आप कुछ खास नहीं खोएंगे और आपका समय बचेगा वो अलग।

Design a site like this with WordPress.com
Get started