थकुन भागुन कंटाळवाणा व कोरोनाच्या भिती ने काळवटलेला दिवस संपवुन मी ऑफिसमधून घरी परत आलो. घरी येताच तिला न बोलता, तिच्याकडे न बघता किंवा तिला कडेवर न घेता,कोरोनापासुन खबरदारी आणि सुरक्षितता म्हणून आंघोळीसाठी सरळ बाथरूममध्ये गेलो. सध्या कोरोनामुळे बाहेरून आल्यानंतर आंघोळ करायला हवी असा सल्ला / सुचना देण्यात आल्या आहेत.
उन्हाळ्याचे दिवस आणि एक तासाच्या प्रवासामुळे मला तहान पण लागली होती.पण आंघोळीपुर्वी खबरदारी म्हणून पाण्याच्या पेल्यालासुद्धा हात न लावणे मी पसंत केले. आंघोळ केल्यावर माझा शीण कमी झाला व मला ताजेतवाने वाटले, त्या नंतर मी मस्त थंड पाणी पिण्याचा विचार करत होतो.
ती सकाळपासूनच माझी वाट पाहत तातकळत होती म्हणून मी घरी परत आल्यापासून माझ्या कडे आशेने बघत होती.चिमुकलीची खुप चिमुकली अपेक्षा होती, मी तिच्याशी बोलावे,उचलुन कडेवर घ्यावे, तिच्याशी खेळावे. पण अंग ओले असल्यामुळे,आधी स्वतः ला टॉवेलने कोरडे करणे आणि कपडे घालणे आवश्यक समजले.ज्या खोली मध्ये मी तयारी करत होतो, त्या खोली मध्ये येऊन ती माझ्या कडे बघत उभी होती.
फक्त २० महिन्यांची ती चिमुकली, आमच एक म्हणून ऐकत नाही आणि कदाचित ऐकले तर त्याच अनुसरण केलेले मला आठवत नाही, पण तीनी काही वेळा त्या विपरित वागुन, आम्ही काय उपदेश दिला होता हे पुनःविचार करायला आम्हाला भाग पाडल आहे.
हे सर्व ज्ञात असुनही (मला लवकर तयार होऊन तिच्या सोबत खेळता यावे) माझ्या मध्येमध्ये तिने चुळबूळ नको करायला म्हणून तिला व्यस्त ठेवण्याकरिता मी तिला सहजच म्हटले “आर्णा जा माझ्यासाठी एक ग्लास पिण्याचे पाणी घेऊन ये”. मला वाटले की ती बहुधा माझ्या बोलण्याला गांभीर्याने घेणार नाही आणि त्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही आणि मला तशी अपेक्षा पण नव्हती, कदाचित अपेक्षा करणे मुंगेरीलाल के हसीन सपने बघण्यासारखा झाल असत.
तिला एक ग्लास पाणी आणायला सांगताच,ती घाइ-घाइत पाय आपटत खोलीतून बाहेर निघुन गेली. तिची अशी प्रतिक्रिया बघुन एका क्षणासाठी मला वाटले तिला माझा राग आला आहे. कारण तिच्यासोबत खेळण्याऐवजी तिला काम करण्यास सांगितले आणि विशेष म्हणजे जेव्हा की ती सकाळपासून माझी खेळायला वाट पाहत होती. मी माझ्या कामात पुन्हा गुंतून गेलो जेणेकरुन लवकरात लवकर तयार होऊन, मी तिला कडेवर वर घेऊन तिच्याशी बोलू शकेन,खेळू शकेन.
२-३ मिनिटानंतर ती पुन्हा खोलीमध्ये परतली आणि तिच्या हातात पाण्याची बाटली पाहिल्यावर मला आश्चर्यच वाटल आणि माझ्या चेहऱ्यावर स्मित हसु आल.
बाटली मधील पाणी आधल्या रात्रीचे होते आणि ते पाणी झाडाला टाकण्यासाठी बाटली बाहेर ठेवली होती. उन्हाळ्याचे दिवसामुळे बाटली मधील पाणी गरम झाले होते. ४४ ℃ तापमानामध्ये ते पाणी पिने त्रासदायक होते.पण त्याक्षणी माझ्या २० महिन्यांच्या मुलीने माझ्याबद्दल दाखवलेल्या ममता,आपुलकी आणि प्रेमाने मी भारावून गेलो होतो, विशेष म्हणजे तिच्याकडून हे सर्व अपेक्षित नसतांना. मी तहानलेला असतांना माझ्या करिता पिण्याचे पाणी आणून, तिने माझ्याबद्दल दाखवलेल्या ममता,आपुलकी आणि प्रेमाकडे दुर्लक्ष करणे तिच्या बाल मनाला नाराज करण्यासारखे होते. म्हणून मी एक सेकंदाचाही विचार न करता ते गरम पाणी पिले. मला पाणी पितांना बघुन, ती बोबड़ी आनंदी झाली आणि टाळ्या वाजवत प्रेमाने गोड हसली. हे सर्व बघुन अचानक माझे डोळे पाणावले.
तेव्हा मला समजले की आमची मुलगी हळु हळु (आमच्या न-कळत) मोठी होत आहे. आता ती आमचे म्हणणे ऐकून घेते आणि त्याप्रमाणे वागते सुद्धा, सोबतच वेगवेगळ्या कृतीतून आपले प्रेम ही दाखवते.
कदाचित म्हणूनच म्हणतात “बेटियां बहूत जल्दी बड़ी हो जाती है और माँ-बाप को पता भी नहीं चलता ….” .
Very nice
LikeLike
Speechless after reading this article
LikeLike